Accident News : बेळगावमध्ये भीषण अपघात! देवदर्शनास गेलेल्या तिघांचा दुर्दैवी अंत
बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू (Accident News) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Accident News : बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू (Accident News) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. पुण्यातील मांडरे कुटुंब सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी कारने जात होते.
प्रवासादरम्यान येरगट्टीहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि कारमधील तिघांनी जागीच प्राण (Accident News) सोडले.
या अपघातत (Accident News) श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, या दुर्घटनेत मांडरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.






