crime news : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास कारावास

संगमनेर – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला दमदाटी व धमकी देणाऱ्या तरुणाला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेशही जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी दिला आहे. ही घटना पाच वर्षांपूर्वी पठारावरील खंडेरायवाडी येथे घडली होती.
जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सरकारपक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पीडितेने न्यायालयासमोर दिलेला जबाब आणि प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. या प्रकरणात सरकारी
वकील बी. जी. कोल्हे यांनी हाती असलेल्या पुराव्यांसह जोरदार युक्तीवाद केला. तो ग्राह्य धरताना न्यायालयाने आरोपी आदेश भाऊसाहेब चाचण याला दोषी ठरवून दोन वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद, त
सेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याचे कलम 8 नुसार तीन वर्षांची सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. या शिक्षेतून वसुल होणारा दंड पीडितेला देण्याचा हुकूमही न्यायालयाने दिला. या प्रकरणात
सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस कॉंस्टेबल स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे, सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, कैलास कुऱ्हाडे, पोहेकॉ.प्रवीण डावरे यांची मदत केली. या निकालाकडे पठारभागातील नागरिकांचे लक्ष लागून होते. या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाल्याने पीडितेसह तिच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.





