Crime News : जुन्नरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांना दणका; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, तीन जण ताब्यात!
अशाप्रकारे दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईतून एकूण ११ लाख ५५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Crime News : बेल्हे तालुका जुन्नर गावच्या हद्दीत बांगरवाडी वस्तीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीररित्या देशी दारू व विदेशी मद्यसाठा करणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११ लाख ५५ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शरद जाधव यांनी दिली.
सचिन गणपत गाडगे वय ४०, ताहीर युसूफ शेख वय ४३ दोघेही राहणार निमगाव सावा ता.जुन्नर जि. पुणे,सागर रामदास बोरुडे व २७ वर्ष आळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील बांगरवाडी वस्तीमध्ये बनावट देशी विदेशी दारूचा मध्य साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ३० ऑक्टोबर रोजी या ठिकाणी छापा टाकला असता २४ हजार किमतीच्या रॉयल स्टॅग व्हिस्की च्या १८० ml च्या ९६ सिलबंद बनावट मद्याच्या बाटल्या तसेच देशी दारू जीएम संत्रा १८० ml च्या ५०४० सीलबंद बाटल्या अंदाजे किंमत ४ लाख ३ हजार दोनशे असा एकूण ४ लाख २७ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपींकडे अधिक चौकशी केली.
यावेळी मौजे अळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून ३ लाख ४८ हजार रु किमतीच्या बनावट रॉयल स्टॅग व्हिस्की च्या १८० ml च्या १३९२ सीलबंद बाटल्या तसेच बनावट इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ३ लाख ८० हजार १६० रुपये किमतीच्या १७२८ सीलबंद बाटल्या असा ७ लाख २८ हजार १६० रुपये किमतीचा मुद्यमाल हस्तगत करण्यात आला.
अशाप्रकारे दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईतून एकूण ११ लाख ५५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेंद्र देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सौरव आवटे, समृद्धी निकम, जवान गणेश वाव्हळ, निलेश केदार, दिलीप केकरे, प्रियंका झांजरे, सुनील कोकणे यांच्या पथकाने केली.






