ऑनलाईन ऑर्डर केली आणि लागला चुना ! क्रिकेटर Deepak Chahar ची झाली फसवणूक..

Deepak Chahar Online Food : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने फूड डिलिव्हरी कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याने नुकत्याच केलेल्या एका ऑर्डरचा स्क्रीनशॉट शेअर केला करत फसवणूक झाल्याचे म्हंटले आहे. दीपक चहर म्हणाले की ऑर्डर मोबाईल ऍप्लिकेशनवर डिलिव्हरी केल्यासारखे दिसत आहे, परंतु मला फूड मिळाले नाही. यानंतर चाहत्यांनी ही पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली.
दीपक चहर याने त्यांच्या एक्स हँडलद्वारे फसवणुकीची माहिती दिली. चहरने सोशल मीडियावर लिहिले, भारतातील नवीन फ्रॉड. ऑर्डर केलेले फूड आणि ॲप डिलिव्हरी केल्याचे दाखवत आहे परंतु मला काहीही मिळाले नाही. कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर ते म्हणाले की डिलिव्हरी झाली आहे आणि मी खोटे बोलत आहे. मला खात्री आहे की अनेकांना अशाच समस्या येत असतील.” | Deepak Chahar Online Food
दीपकने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली तक्रार
फूड डिलिव्हरी कंपनीने दीपकच्या पोस्टला लगेच प्रतिसाद दिला. तसेच गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. फूड कंपनीने लिहिले, “हाय दीपक, आम्ही तुमच्या अनुभवाबद्दल खूप चिंतित आहोत आणि गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. निश्चिंत रहा, आम्ही अशा समस्या गांभीर्याने घेतो आणि त्वरित निराकरण सुनिश्चित करण्यासाठी या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊ.” | Deepak Chahar Online Food
new fraud in India 😂 . Ordered food from @zomato and app shows delivered but didn’t receive anything. After calling the customer service they also said that it’s been delivered and m lying 🤥 . M sure lot of people must be facing same issues. Tag @zomato and tell your story . pic.twitter.com/PwvNTcRTTj
— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) February 24, 2024
चाहत्यांनी पोस्ट केली व्हायरल
मात्र, दीपकच्या पोस्टनंतर चाहत्यांनी ती व्हायरल केली आणि त्यांचे अनुभव शेअर केले. शनिवार 24 फेब्रुवारी 2024 रोजी पोस्ट केल्यापासून या पोस्टला 173K व्हिवज, 2K लाईक्स, 265 रिट्विट्स आणि 230 कमेंट मिळाल्या आहेत. | Deepak Chahar Online Food





