Deepak Chahar Celebration : मुंबई हरली पण दीपक चहरनी वेधलं लक्ष! पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतल्यानंतर केलं असं काही की… पाहा VIDEO
Deepak Chahar Celebration : दीपकने पहिल्याच षटकात कोलकाताचा धोकादायक सलामीवीर फिन अॅलनला बोल्ड केल्यानंतर भन्नाट सेलिब्रेशन केले.

Deepak Chahar Celebration Video Viral : आयपीएल २०२६(IPL2026) मधील ६५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (MI) कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध (KKR) पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या एका आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनने क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ईडन गार्डन्सवर १४८ धावांच्या छोट्या आव्हानाचा बचाव करताना दीपकने पहिल्याच षटकात कोलकाताचा धोकादायक सलामीवीर फिन अॅलनला बोल्ड केले. या विकेटनंतर दीपकने आयपीएलमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘पर्ची (चिठ्ठी) सेलिब्रेशन’ची भर मैदानात नक्कल करत खिल्ली उडवली.
फिन अॅलनचा त्रिफळा उडवला अन् खिशात हात घातला! (Deepak Chahar Celebration)
कोलकाताच्या डावातील पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर फिन अॅलनने दीपक चहरच्या शॉर्ट चेंडूवर कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची आतील कडा घेऊन थेट स्टम्प्सवर आदळला. अॅलन ५ चेंडूत ८ धावा करून बाद झाल्यानंतर दीपक चहरने खिशातून एक काल्पनिक चिठ्ठी काढल्याचा अभिनय केला आणि ती वाचत असल्याचा मजेशीर हावभाव केला. दीपकचा हा अंदाज पाहून थेट कमेंट्री बॉक्समध्ये बसलेला आकाश चोप्राही स्वतःची हसू रोखू शकला नाही. या हंगामात उर्विल पटेल आणि आकाश सिंग (Akash Singh) यांसारख्या खेळाडूंनी विकेट घेतल्यानंतर खिशातील चिठ्ठी दाखवून सेलिब्रेशन केले होते, ज्याची चहरने आता फिरकी घेतली आहे.
Came for the wicket, stayed for the surprise celebration! 😂🙌
A dream start for MI as they strike in the very first over of the chase! 🔥#TATAIPL Race to Playoffs 2026 👉 #KKRvMI | LIVE NOW ➡️ https://t.co/kVSpVvhylO pic.twitter.com/YXOqMqLPUr
— Star Sports (@StarSportsIndia) May 20, 2026
केकेआरने मारली बाजी – (Deepak Chahar Celebration)
सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत ८ बाद केवळ १४७ धावा केल्या होत्या. कॉर्बिन बॉशच्या १८ चेंडूंतील नाबाद ३२ धावांच्या खेळीमुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. कोलकाताकडून सौरभ दुबे, कॅमेरुन ग्रीन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात केकेआरची सुरुवात खराब झाली, पण मनीष पांडे (४५ धावा) आणि रोव्हमन पॉवेल (४० धावा) यांच्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने १८.५ षटकांत ६ बाद १४८ धावा करत ४ विकेट्सनी सामना खिशात घातला.
हार्दिकला राग व्यक्त करणे पडले महागात – (Deepak Chahar Celebration)
या सामन्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने निराश झालेला हार्दिक पंड्या गोलंदाजी संपवून जेव्हा आपल्या रनअपवर परत जात होता, तेव्हा त्याने संतापाच्या भरात विकेटवरील बेल्स हाताने जोरात मारून खाली पाडल्या. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि पंचांनी याची गंभीर दखल घेतली. हार्दिकनेही आपली चूक मान्य केल्यामुळे या प्रकरणावर कोणतीही औपचारिक सुनावणी झाली नाही. परंतु त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली





