MI vs CSK सामन्यापूर्वी धोनी मुंबईच्या खेळाडूला बॅटने मारण्यासाठी धावला, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni runs to hit Deepak Chahar with bat ahead MI vs CSK match : आयपीएलमध्ये जेव्हा जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावर एक अद्भुत सामना पाहायला मिळतो. पण कधीकधी सामन्यापूर्वीही काही मनोरंजक दृश्ये दिसतात. आयपीएल २०२५ मध्येही हा ट्रेंड सुरूच आहे, जिथे सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्रादरम्यान पुन्हा एकदा असे घडले की सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी मुंबईचा वेगवान गोलंदाजाला बॅटने म मारण्यासाठी धावताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दीपकला मारण्यासाठी धोनी बॅट घेऊन धावला –
२० एप्रिल रोजी संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान एमआय आणि सीएसके यांच्यात सामना खेळला जाणारा आहे. या सामन्यापूर्वी, एक व्हिडीओ समोर आला व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीला एमआयचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इतका त्रास दिला की तो त्याला मारण्यासाठी बॅट घेऊन त्याच्याकडे धावला. यानंतर हा गोलंदाज माहीला काहीतरी सांगत असल्याचे दिसून आले. स्पष्टपणे, ही धोनीची विनोदी शैली होती जिथे तो त्याच्या ज्युनियरसोबत मजा करताना दिसला.
View this post on Instagram
चेपॉकमध्ये पाहिला मिळाला होता दोघांचा याराना –
आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या मेगा लिलावापूर्वी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला रिलीज केले होते. त्यामुळे हंगामात दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. तो जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा धोनीला चिडवायला जातो. ते एमएस धोनी देखील बऱ्याचदा मजा-मस्करी करताना दिसतो. यापूर्वी, चेपॉक येथील शेवटच्या सामन्यात, दीपक चहरने एमएस धोनीला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. या सामन्यादरम्यान, दीपकने त्याच्या माजी कर्णधाराला स्लेजिंग केले होते आणि त्यावर त्याने त्याच्याच शैलीत उत्तर दिले होते.
हेही वाचा – RR vs LSG : ‘१४ वर्षांचा मुलगा लोकांना वेडं बनवतोय…’, अर्शीन कुलकर्णीचा वैभवबद्दल मोठा खुलासा
सामन्यानंतर हा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. दीपक चहर २०१८ ते २०२४ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. तसेच, धोनी आणि दीपक चहरमध्ये चांगली मैत्री आहे आणि ते एकमेकांची मस्करी करत राहतात. मुंबईविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, महेंद्रसिंग धोनीचे वानखेडेवर पुनरागमन सीएसकेसाठी चांगले ठरू शकते, जिथे त्याने २०२४ मध्ये एमआयविरुद्ध चार चेंडूत २० धावा करून सामन्याचे चित्र बदलले होते.





