IPL Mega Auction 2025 : दुसऱ्या दिवशी ‘या’ 3 भारतीयांवर पडला पैशांचा पाऊस, मुंबईने CSKकडून हिसकावला धोनीचा खास खेळाडू….

IPL Mega Auction 2025 (Day 2) : आयपीएल 2025 मेगा लिलावात सर्व 10 संघांनी मिळून पहिल्या दिवशी 467.95 कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी संघांच्या पर्समध्ये फारच कमी पैसे शिल्लक राहिले. असे असतानाही दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय खेळाडूंवर उच्च बोली लावण्यात आली.
भुवनेश्वर कुमारला आरसीबीने 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले याशिवाय अन्य भारतीय वेगवान गोलंदाजांवरही मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला. चला तर मग जाणून घेऊया त्या तीन भारतीय खेळाडूंबद्दल ज्यांच्यावर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची खूप कृपा झाली.
1. दीपक चहर – 9.25 कोटी (मुंबई इंडियन्स) : वेगवान गोलंदाज दीपक चहर 2018 पासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता. त्याला मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात 9.25 कोटींची बोली लावून विकत घेतले. एमआयला यापूर्वी भुवनेश्वर कुमारला खरेदी करता आले नव्हते, परंतु दीपकला त्याच्या जागी विकत घेण्यात यश आले. नवीन चेंडूवर प्रभावी ठरणाऱ्या दीपकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 58 विकेट्स घेतल्या आहेत.
Mukesh Kumar is back with @DelhiCapitals 💥💥@DelhiCapitals have exercised the Right to Match option! 🙌🙌
He’s SOLD for INR 8 Crore 💰#TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
2. मुकेश कुमार – 8 कोटी (दिल्ली कॅपिटल्स) : मुकेश कुमार हा गेल्या 2-3 वर्षात क्रिकेट जगतातील सर्वात उदयोन्मुख गोलंदाजांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला राईट टू मॅच कार्ड वापरून 8 कोटी रुपयांना खरेदी केले. हा करार देखील मुकेशसाठी फायदेशीर ठरला कारण गेल्या हंगामापर्यंत दिल्ली कॅपिटल्स त्याला 5.5 कोटी रुपये मानधन देत होती. मुकेशने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 20 सामने खेळून 24 विकेट घेतल्या आहेत.
3. आकाशदीप – 8 कोटी (लखनौ सुपर जायंट्स) : आकाशदीप 2022 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे, परंतु त्याने यावर्षी भारतासाठी पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. साहजिकच टीम इंडियात आल्यानंतर आणि चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जनेही आकाशदीपवर बोली लावली, पण शेवटी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 8 कोटी रुपयांना विकत घेतले.





