CSK vs MI : एमएस धोनीने मुंबईविरुद्धच्या विजयानंतर दीपक चहरला मारली बॅट, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni hit Deepak Chahar With his bat after match CSK vs MI : आयपीएल २०२५ चा तिसरा सामना रविवारी चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. पाच वेळा आयपीएल विजेत्या सीएसकेने एमआयचा ४ गडी राखून पराभव केला. चेन्नईने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात चाहत्यांना धोनीची फलंदाजी पाहिला मिळाली. सामन्यानंतर धोनीचा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज दीपक चहरसोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
धोनी आणि दीपक चहरचा व्हिडीओ व्हायरल –
या सामन्यात एमएस धोनीच्या फलंदाजीची एक झलक पाहण्यासाठी चाहते मैदानात उत्सुकतेने वाट पाहत होते. थाला निश्चितच फलंदाजीला आला. पण त्याला एकही धाव काढता आली नाही. माहीला २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. सामन्यानंतर, एमएस धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माही माजी सीएसके खेळाडू दीपक बॅट मारताना दिसत आहे.
https://twitter.com/lofteddrive45/status/1903865189168238730
धोनीने दीपकला मारली बॅट –
Dhoni being Dhoni, Chahar being the usual victim.💛💙#MSDhoni #Thala #CSKvsMI pic.twitter.com/VE4rwOFXAn
— INDIAN CRICKET FC (@monk258012) March 24, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चेन्नई आणि मुंबईचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. यावेळी, माही विशेषतः दीपक चहरच्या येण्याची वाट पाहतो. चहर धोनीसमोर येताच, धोनी त्याला काहीतरी म्हणतो आणि नंतर मस्करीत त्याच्या बॅटने मारतो. दीपक चहर आणि एमएस धोनी यांचे एकमेकांशी खूप चांगली मैत्री आहे, दोघेही अनेकदा मैदानावर एकमेकांची मस्करी करताना दिसतात. विशेष म्हणजे या सामन्यात जेव्हा धोनी फलंदाजी आला होता, तेव्हा दीपक चहर धोनीला मस्करीत स्लेजिंग करत होता.
हेही वाचा – CSK vs MI : विघ्नेश पुथूरच्या फिरकीची धोनीलाही पडली भुरळ, सामन्यानंतर दिली शाब्बासकीची थाप, VIDEO व्हायरल
दीपक चहर ७ वर्षें सीएसके संघाचा होता सदस्य –
३२ वर्षीय दीपक चहरने २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, २०१८ ते २०२४ पर्यंत, चहर फक्त चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. परंतु, आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी, सीएसकेने दीपकला सोडले आणि लिलावादरम्यान त्याच्यासाठी आरटीएम कार्ड देखील वापरले नाही. यानंतर मुंबई इंडियन्सने दीपक चहरला ९.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलमध्ये चहरसाठी एमआय ही तिसरी फ्रँचायझी आहे.





