Somnath Suryavanshi Case | सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील कोर्टाचा निकाल आशादायी; प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या युक्तिवादाचा व्हिडीओ चर्चेत

Somnath Suryavanshi Case | परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यामुळे दोषी पोलिसांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
या खटल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या बाजूने युक्तिवाद केला होता. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला युक्तिवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विजयबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात तथ्ये सादर केली आणि यशस्वीरित्या युक्तिवाद केला. २४ डिसेंबर २०२४ रोजी परभणीतील न्यू मोंढा पोलिस स्टेशनमध्ये विजयबाईंनी केलेल्या अर्जानुसार एफआयआर दाखल करण्याचा आणि तपास सुरू करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला, असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे. सोबतच त्यांनी न्यायालयातील व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
Presented facts and successfully argued in the Hon’ble Supreme Court of India for Vijaybai Vyankat Suryawanshi.
The Supreme Court maintained the order of the Aurangabad Bench of the Bombay High Court to file FIR and launch investigation as per the application made by Vijaybai on… pic.twitter.com/m8CdCtfqh2
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 30, 2025
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मोठा विजय
सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणीत १० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारात ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी एक मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. Somnath Suryavanshi Case |
नेमकं प्रकरण काय?
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन केले आणि बंद पुकारला होता. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता.
सोमनाथच्या आईने या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर सोमनाथची बाजू मांडली होती. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे सोमनाथच्या कुटुंबियांच्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळाले असल्याचे म्हंटले जात आहे.
हेही वाचा:





