Suresh Dhas : सुरेश धसांविरोधात भीम आर्मीने घेतली आक्रमक भूमिका; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

बीड : काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये हिंसाचार झाला होता. यादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांचा यालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या मृत्यूच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. यावेळी भाजप आमदार सुरेश धस आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा लॉन्ग मार्च नाशिक येथे स्थगित करण्यात आला होता. यावेळी सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस म्हणाले कि सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांना मारले, त्यांना एक संधी द्या, त्यांना माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू नका. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यावरून विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.
सुरेश धसांवर ॲट्रॉसिटी दाखल करा
या आमदाराने आमचा लॉन्ग मार्च चिरडण्याचं काम केलं आहे, एक षड्यंत्र केलेले आहे. यामुळे आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे सुरेश धस यांच्यावर तत्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सुरेश धस यांना दिला इशारा
सुरेश धस तुम्ही ज्या ठिकाणी भेटाल, त्या ठिकाणी तुम्हाला आंबेडकरी समाज सोडणार नाही. सुरेश धस महाराष्ट्राची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही, असा इशारा देखील अशोक कांबळे यांनी यावेळी दिला.





