प्रवीण दरेकरांना कोर्टाचा दिलासा, सोमवारपर्यंत अटक टळली!

मुंबई : मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.
तसंच, प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली.
मुंबई बॅंक प्रकरणात प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात दरेकरांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका हायकोर्टाने फेटाळली. आपल्यावरील गुन्हा रद्द करवा अशी त्यांची मागणी होती.
दरेकर यांनी आपण मजूर असल्याचे सांगून मजुरांसाठीच्या राखीव असलेल्या जागेवर ते बॅंकेचे संचालक झाले होते. हे प्रकरण आम आदमी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने लाऊन धरले होते.





