Vaibhav Khedekar | कोकणातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. एकेकाळी राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या वैभव खेडेकर यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. त्यानंतर मनसेकडून वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश लवकरच होईल, असा अंदाज लावला जाऊ लागला. मात्र अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेश रेंगाळला आहे. तीनवेळा पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबवणीवर याचदरम्यान खेडेकर यांनी बुधवारी (ता.8) दुसऱ्यांदा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. याचबरोबर त्यांनी कॅबिनेट दर्जा मिळालेले भाजप नेते स्वयंम पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचीही भेट घेतली आहे. भाजपने अद्याप वैभव खेडेकर यांना मुंबईत पक्षप्रवेशासाठी बोलावून घेतलेले नाही. जवळपास तीनवेळा त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबवणीवर पडला. त्यामुळे आता वैभव खेडेकर यांनी स्वत:हूनच मुंबईत येत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. Vaibhav Khedekar | शिवसेनेची ऑफर पक्षप्रवेशासाठी वैभव खेडेकर यांना सध्या भाजप नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एकेकाळी कोकणातील मनसेचे ताकदवान नेते म्हणून वैभव खेडेकर यांची ओळख होती. मात्र, आता त्यांची अवस्था बिकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट खेडेकर यांनी शिवसेनेची ऑफर दिली. तसेच जे भाजपने तीनदा केलं ते आम्ही करणार नाही असा शब्द देत असल्याचेही म्हटलं. परंतु सामंत यांच्या या बोलण्यामुळे खेडेकर यांचा भाजप अपमान करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान त्यांनी भाजप नेत्यांची भेट चव्हाण यांची भेट नेमकी का घेतली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार? याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहे. Vaibhav Khedekar | हेही वाचा: “सत्तेत असताना तुम्हाला पीडीएची आठवण का आली नाही?” ; मायावतींची सपा अन् काँग्रेसवर टीका