इम्रान खान आणि बुशरा बिबी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
Updated On:

इस्लामाबाद – पाकिस्तानातील उत्तरदायित्व न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्यावर अल कादिर प्रकरणी १९० दशलक्ष पौंडांच्या भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले आहेत.
इम्रान खान यांना रावळपिंडीतल्या ज्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे, तेथेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. यावेळी बुशरा बिबी या देखील उपस्थित होत्या.
अल कादिर विद्यापीठ ट्रस्टच्या नावे हजारो कनाल जमिन अत्यंत अल्प दरात मिळवल्याली होती. या व्यवहारामुळे सरकारचे १९० दशलक्ष पौंडांचे नुकसान झाल्याचा आरोप इम्रान खान आणि बुशरा बिबी यांच्यावर आहे.
या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी ५८ जणांच्या साक्षी नोंदवल्या जाणार आहेत. इम्रान खान आणि बुशरा बिबी या दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्चला होणार आहे.





