नगरसेविका लोखंडे यांचा राजीनामा
Updated On:

पिंपरी -पिंपळे गुरव येथील भाजपच्या चंदा लोखंडे यांनी आज (सोमवारी) नगरसेविकापदाचा राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला आहे.
2017 मध्ये चंदा लोखंडे या पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. गेल्या वर्षी पक्षाने त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदही दिले होते.
काही दिवसांपूर्वी मोशीतील वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी सात महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.





