Coronavirus In India : देशात गेल्या 24 तासात 38 हजार नवीन रुग्ण; 560 जणांचा मृत्यू
Updated On:

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 38 हजार 79 रुग्ण आढळून आले असून याच अवधीत देशात करोनामुळे 560 जणांचे मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे रोज सकाळी आठ वाजता देशातील करोना स्थितीची गेल्या 24 तासांतील माहिती दिली जाते त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, देशातील ऍक्टिव्ह पेशंट्सची संख्या आता कमी होऊन ती 4 लाख 24 हजार 25 इतकी झाली असून ऍक्टिव्ह केसेसचे प्रमाण 1.36 टक्के इतके आहे. देशाचा डेली पॉझिटिव्हिटी रेट काल 1.91 टक्के इतका नोंदवण्यात आला.
गेले 26 दिवस तो सतत तीन टक्क्यांच्या खाली राहिला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 2.10 टक्के इतका कायम आहे. आतापर्यंत करोनातून 3 कोटी 2 लाख 27 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. काल अखेरपर्यंत देशात लसीकरण झालेल्यांची संख्या आता 39 कोटी 96 लाख इतकी झाली आहे.
टॅग्स:





