Coronavirus in India । Lockdown : काही वर्षांपूर्वी जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा सगळीकडे आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोविड-19 म्हणजेच कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक अपडेट शेअर केले आहे. त्यानुसार देशभरात अर्लट जारी करण्यात आला आहे. सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोना पुन्हा झपाटयाने वाढत आहे. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनामुळे 257 केसेस महाराष्ट्रात आढळल्या आहेत. मुंबईतही कोरोनाच्या केसेस आढळल्या आहेत. मुंबई महानगरापालिकेच्या आकडेवारीनुसार 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अश्यातच आरोग्य तज्ज्ञांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. भारतात या कोरोनाची लाट फारशी चिंताजनक नसेल, असं सांगण्यात येत आहे. ‘भारतात जेव्हा कोरोनाची लाट आली, तोपर्यंत भारतीयांनी लस घेतल्या होत्या. आता कोरोनाची गंभीर लाट येणार नाही. लॉकडाऊनचा प्रश्न सोडून द्या, पावसाळा आणि हिवाळा येतोय. त्यावेळी फक्त व्हायरल इन्फेक्शन वाढतात. त्यावेळी सावधानता बाळगावी, अशी माहिती सीएसआयआरचे माजी महानिरीक्षक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. विषाणूमध्ये भरपूर उत्परिवर्तन होत असतात. त्यामुळे या कोरोना विषाणूचे उत्परिवर्ती येताच राहणार आहे, पण त्याचे परिणाम फारसे गंभीर नसणार असं, डॉ. मांडे म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. डॉ. शेखर मांडे म्हणाले ‘तुम्ही खबरदारी म्हणून मास्क वापरू शकता, पण लॉकडाऊनची कुठलीच शक्यता आणि तसेच नवीन लस घेण्याबाबत सरकारने कुठलीही भूमिका जाहीर केली नसल्यामुळे कुठलेही चिंतेचा वातावरण नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्दी ताप आल्यावर खबरदारीचे उपाय घेणे म्हणजेच पाणी उकळून पिणे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, या गोष्टी केल्या तर या विषाणूंची लागण होणार नाही, असं ते म्हणाले. भारतात सध्या 257 सक्रिय रुग्ण आहेत. ज्यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये 69 नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 44 आणि तामिळनाडूमध्ये 34 रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रातही दोन मृत्यूंची नोंद झाली, जे डॉक्टरांच्या मते कोरोनामुळे झालेले मृत्यू नाहीत, परंतु दोन्ही रुग्ण कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण : महाराष्ट्रात सध्या 56 कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयाने अलीकडेच दोन मृत्यूची नोंद केली असून एक 59 वर्षीय कर्करोग रुग्ण आणि एक 14 वर्षीय मुलगी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. दोन्ही रुग्णांचा मृत्यू अंतर्निहित आजाराने झाला असला तरी, त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. कोविडचा इतर देशांमध्येही प्रवेश : आशियातील अनेक देशांमध्ये कोविडने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नेशन थायलंडच्या मते, 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये 31 प्रकरणे नोंदवली गेली. सिंगापूरमध्ये, 27 एप्रिल ते 3 मे या आठवड्यात कोविड-19 प्रकरणांची अंदाजे संख्या 14, 200 होती, जी मागील आठवड्याच्या आकडेवारीपेक्षा जास्त होती. गेल्या आठवड्यात 11, 100 प्रकरणे नोंदवण्यात आली.