Coronavirus : देशात कोरोनाने हातपाय पसरले.., महाराष्ट्रासोबत ‘या’ राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

Coronavirus in India । काही वर्षांपूर्वी जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा सगळीकडे आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोविड-19 म्हणजेच कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात एक अपडेट शेअर केले आहे. त्यानुसार देशभरात अर्लट जारी करण्यात आला आहे.
सिंगापूर आणि हाँगकाँग इतर देशात कोरोना पुन्हा झपाटयाने वाढत आहे. आता राज्यातही सावधानता बाळगण्याची सूचना जारी झाल्या आहेत. कोरोनामुळे 257 केसेस महाराष्ट्रात आढळल्या आहेत. मुंबईतही कोरोनाच्या केसेस आढळल्या आहेत. मुंबई महानगरापालिकेच्या आकडेवारीनुसार 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे. तसेच कोरोनाच्या संक्रमनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या एका अहवालानुसार, “19 मे पर्यंत देशात कोविडचे 257 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.” त्यामुळे देशात अर्लट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भारतासोबतच इतर देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आशियामध्ये कोविड 19 च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे JN1 प्रकाराची आहेत.
भारतात सध्या 257 सक्रिय रुग्ण आहेत. ज्यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये 69 नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 44 आणि तामिळनाडूमध्ये 34 रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रातही दोन मृत्यूंची नोंद झाली, जे डॉक्टरांच्या मते कोरोनामुळे झालेले मृत्यू नाहीत, परंतु दोन्ही रुग्ण कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण :
महाराष्ट्रात सध्या 56 कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयाने अलीकडेच दोन मृत्यूची नोंद केली असून एक 59 वर्षीय कर्करोग रुग्ण आणि एक 14 वर्षीय मुलगी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. दोन्ही रुग्णांचा मृत्यू अंतर्निहित आजाराने झाला असला तरी, त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.
कोविडचा इतर देशांमध्येही प्रवेश :
आशियातील अनेक देशांमध्ये कोविडने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नेशन थायलंडच्या मते, 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये 31 प्रकरणे नोंदवली गेली. सिंगापूरमध्ये, 27 एप्रिल ते 3 मे या आठवड्यात कोविड-19 प्रकरणांची अंदाजे संख्या 14, 200 होती, जी मागील आठवड्याच्या आकडेवारीपेक्षा जास्त होती. गेल्या आठवड्यात 11, 100 प्रकरणे नोंदवण्यात आली.





