Coronavirus In India : गेल्या 24 तासात 7 हजार 974 नवीन रुग्ण, मृतांचा आकडा चिंताजनक
Updated On:

नवी दिल्ली – पुन्हा एकदा करोनाने चिंता निर्माण केली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत करोना संसर्गाची 7 हजार 974 रुग्णांची नोंद केल्या गेली आहेत, जी कालच्या तुलनेत 14.2 टक्क्यांनी जास्त आहे. या कालावधीत 343 लोकांचा मृत्यू झाला आहे, जो काल जाहीर झालेल्या आकडेवारीपेक्षा 96ने अधिक आहे. यादरम्यान 7 हजार 948 लोक बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात एकूण 87 हजार 245 सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत एकूण 3,41,54,879 लोक बरे झाले आहेत. दुसरीकडे, जर आपण एकूण मृतांच्या संख्येबद्दल बोललो, तर ती वाढून 4,76,478 झाली आहे. देशात आतापर्यंत लसीचे एकूण 135 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.





