Corona In India : पुन्हा वाढले कोविडचे रुग्ण; दैनंदिन रुग्णसंख्या 25 हजारावरून 44 हजारवर
Updated On:

नवी दिल्ली – देशातील कोविडच्या रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेले काही दिवस ही संख्या 25 हजाराच्या आसपास असायची; पण काल पुन्हा ती संख्या 44 हजार 658 वर गेली आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्ण संख्येचा आकडा र्आता 3 कोटी 26 लाख 3 हजार 188 वर गेला आहे.
कालची ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 3 लाख 44 हजार 899 वर गेली आहे. काल दिवसभरात एकूण 496 जण मरण पावल्याने मृतांचा आकडा आता 4 लाख 36 हजार 861 इतका झाला आहे. केरळात कोविडचे रुग्ण लक्षणीयरित्या वाढत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून आली आहे. दरम्यान कोविड लसीकरणाचा वेग आता वाढवावा, अशी मागणी होत असून अनेक राज्यांनी जादा लसींची मागणी नोंदवली आहे.





