CoronaVaccine : दिल्ली-पंजाबमध्ये 18-44 वयोगटातील लोकांचे लसीकरण लांबणीवर

वंदना बर्वे
नवी दिल्ली  – कोविड व्हॅक्‍सीनची खेप न मिळाल्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करता येणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारकडून मिळणारी लसीचे खेप अद्याप मिळालेली नाही. यामुळे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करू नये. एक दोन दिवसात व्हॅक्‍सीन मिळताच लसीकरण सुरू केले जाईल.

केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, लसीची खेप अद्याप मिळालेली नाही. एक दोन दिवसात कोविशिल्डचे तीन लाख लस मिळतील. यानंतर 18 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण केले जाईल. दिल्ली सरकारने मागील तीन महिन्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सीनच्या 67 लाख लसीचे ऑर्डर दिले आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

व्हॅक्‍सीन कंपन्यांनी लसीचा पुरवठा आर्डरप्रमाणे केला तर पुढील तीन महिन्यात सर्वांचे लसीकरण केले जाईल. प्रत्येक व्यक्तीला लस दिली जाईल. सध्या दिल्लीत कोरोना पॉझिटीव्ह लोकांची संख्या 11 लाख 22 हजाराच्या वर पोहचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.