‘अद्वैत क्रीडा केंद्रा’च्या वतीने कोविड यौद्ध्यांचा सन्मान

पुणे – कोव्हिड-19 आपत्तीमध्ये आपल्या भागात, देशासाठी, समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरीकांच्या सुरक्षेसाठी आहोरात्र कार्य करणाऱ्या युवकांना ‘अद्वैत क्रीडा केंद्र पुणे’ यांच्या वतीने कोव्हीड योद्धा पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयजी जगताप (सामाजिक कार्यकर्ते), संजय गायकवाड (उपनिरीक्षक पोलीस क्राईम पुणे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते,) मृणालिनी वाणी (महिला अध्यक्ष राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टी पुणे शहर), डॉ मदन कोठुळे हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदय जगताप यांनी सर्व कोविड योध्दाचे कौतुक केले. हे सर्व कोव्हिड योद्ध असुन समाजातले अँन्टीबॉडीज आहेत. असा गौरव करण्यात आला.
सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन जामगे, डॉ रणजित निकम, पत्रकार सुनिल जगताप, पोलीस अमित सांळुके, भाजचच्या भाग्यश्वी बोरकर, युवक राष्ट्रवादी पक्षाचे रोहन पायगुडे, गजानन लोंढे, प्रशांत कदम, समीर पवार, संदिप काळे, युवक कॉग्रेस चे सौरभ अमराळे, निलेश सांगळे, शिवसैनिक सुरज लोंखडे, मनसे चे निलेश हांडे यांना कोव्हिड योद्धा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मदन कोठुळे सर यांनी केले. सुत्रसंचालन संजय कांबळे, आभार प्रदर्शन युवराज दिसले यांनी केले. धनंजय मदने, सुर्यकांत तिवडे, शिवाजी गवारे, शिंदे सर, रत्नाताई कोठुळे, गोरीताई भगत, लखन मोरे, तन्वीर शेख यांनी कार्यक्रम यशस्वी केला.





