Corona vaccien : लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकले

नवी दिल्ली – कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात एकूण लस घेतलेल्या नागरिकांच्या सख्येत भारताने आज अमेरिकेला मागे टाकले. भारतात आजच्या घडीला 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 जणांना लस दिली आहे. तर अमेरिकेत लस घेतलेल्यांची संख्या 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 आहे, अशी माहिती आरोग्य मंणत्रालयाच्या वतीने देण्यात आली.
लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सज्ञान व्यक्तींपैकी 46.5 टक्के जणांचे लसीकरण झाले आहे. तर भारतीय लोकसंख्येच्या एकून चार टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र अमेरिकेपेक्षा भारतात लसीकरण एक महिना उशीरा सुरू झाले.
भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली होती. उपलब्ध अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसी देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 लस डोस देण्यात आल्या आहेत.
46 हजार नवे बाधित
भारतात गेल्या 24 तासात 46 हजार 148 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 21 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 5 लाख 72 हजार 994 इतकी आहे.
गेल्या 24 तासात 58 हजार 578 रुग्ण बरे
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 13 हजार 409 इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ 1.89 टक्के सक्रीय रुग्ण आहेत. कोविड -19 संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहे. त्यामुळे सलग 46 व्या दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 58 हजार 578 रुग्ण बरे झाले.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरातील घट कायम
रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 96.80 टक्के झाला आहे. चाचण्यांच्याही क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 15 लाख 70 हजार 515 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 40.63 कोटींपेक्षा अधिक (40,63,71,279) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरातील घट कायम आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 2.8 टक्के तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.94 टक्के आहे. सलग 21 व्या दिवशी हा 5 टक्के पेक्षा कमी आहे.





