पुणे -जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे चार ते साडेचारच्या आसपास असलेला करोना बाधित दर आज 3.61 टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे. एकीकडे बाधित दर खाली येत असल्यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र, करोनामुळे मृत्यु होणारे प्रमाण
जैसे थे आहे. आजही करोनामुळे पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात मंगळवारी एकूण 683 नवीन करोना बाधित सापडले. तर 802 जण करोनामुक्त झाले आहेत. बाधितांमध्ये शहर कार्यक्षेत्रात 168,
पिंपरी-चिंचवडमध्ये 151 तर ग्रामीण आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात 361 बाधितांचा समावेश आहे. मागील चार दिवसांपासून ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतील बाधितांमध्ये हळूहळू घट होवू लागली आहे.
9 हजार 727 जणांच्या नमुने तपासणीतून 361 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामीणमधील एकूण मृत्युची संख्या 5 हजार 212 वर पोहचली आहे. आज दिवसभरात 13 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.