Shaan E Hind : मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याच्या प्रकरणामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणी हिंदुत्वादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत निषेध व्यक्त करत फोटो काढून टाकण्याची मागणी केली होती. वाढता विरोध लक्षात घेत दालनात लावण्यात आलेला टिपू सुलतानाचा फोटो काढून टाकण्यात आला. यानंतर या फोटोवरून ओढवलेल्या वादावर उपमहापौर शान-ए-हिंद ( Shaan E Hind ) यांनी आपली प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. “मी टिपू सुलतान यांचा दालनात फोटो लावल्याने त्यांचे महान कार्य अनेकांना कळाले. टिपू सुलतान यांच्या सैन्यातील अनेक प्रमुख हे ब्राह्मण होते. टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे, हे भाजपला माहितच नाही,” अशी प्रतिक्रिया शान ए हिंद यांनी दिली आहे. मी एक ओबीसी वर्गातून आलेली आहे म्हणून मला टार्गेट केले जात असल्याचा आरोप ‘शान ए हिंद’ यांनी केला आहे. तसेच त्यांनी संविधानात ज्यांचा फोटो आहे तो हटविण्याचा अधिकार भाजप व इतरांना कोणी दिला? असा सावल करत विरोध दर्शवणाऱ्या भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य शान-ए-हिंद यांनी केल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद या पदभार स्विकारतानंतर दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत. त्या समाजवादी पार्टीच्या तिकीटावर मालेगाव महापालिकेवर निवडून आलेल्या आहेत. त्यांची उपमहापौर पदावर निवड झाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सपकाळांच्या विधानाने वादात भर या सगळ्यात कमी काय म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादात उडी घेत टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने हा वाद आणखीच चिघळला. सपकाळ यांनी केलेल्या विधानावरून भाजपसह हिंदूत्ववादी संघटनांनी त्यांना लक्ष केले. हा वाद अजूनही सुरू असून हर्षवर्धन सपकाळ आपल्या विधानावर ठाम आहेत. हेही वाचा : Sunetra Pawar : मोठी बातमी! नरहरी झिरवळांवर सुनेत्रा पवारांची नाराजी; बैठकीत स्पष्ट शब्दांत म्हणाल्या “स्वतःची आणि…”