Statement on Sharad Pawar : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड; ‘या’ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Statement on Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भिडे यांनी ते "महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड" असल्याचे म्हटले

Statement on Sharad Pawar : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Statement on Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भिडे यांनी ते “महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड” असल्याचे म्हटले असून, “शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह” असे गंभीर आरोप केले आहेत. “अशी लवासाची कीड राज्याला लागली असून, ती काढून टाकू” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हे विधान कर्जत येथे लोहगड, भीमगड, भिवगड अशा गडकिल्ल्यांच्या मोहिमेदरम्यान केले गेले असून, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?
संभाजी भिडे हे सध्या धारातीर्थी यात्रेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात गडकिल्ले मोहिमेसाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर ताशेरे ओढले. “शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे.
शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. राज्याला अशी लवासाची कीड लागली असून, ती काढून टाकू,” असे ते म्हणाले. हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आणि तीव्र असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वाद अधिक तापण्याची शक्यता आहे.
भिडे यांचे वादग्रस्त विधानांचा इतिहास
संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरून वाद निर्माण केले आहेत. महिलांविषयी, इतिहासाच्या व्याख्यांबाबत आणि विविध नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत.
हे पण वाचा : चंद्रपूरच्या राजकारणात होणार मोठा उलटफेर? भाजप मोठी चाल खेळणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने यापूर्वीही भिडे यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
भिडे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त होत असून, काही नेत्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या समर्थकांकडून मात्र भिडे यांच्या भूमिकेचे समर्थन होत आहे.
हे पण वाचा : Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटातील अभिनेता अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर 10 वर्ष केला अत्याचार
हे विधान सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये जोरदार चर्चेत असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यावरील हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने, यावर अधिकृत प्रतिक्रिया आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे पण वाचा : धक्कादायक निर्णय! केएल राहुलचे संघात पुनरागमन, कर्णधारही अचानक बदलला






