Karnataka Ranji Squad Announce : रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या पुढील सामन्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) आपला संघ जाहीर केला असून, यात अत्यंत धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत. अनुभवी मयंक अग्रवालला कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून,युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच, भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल देखील कर्नाटककडून खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. देवदत्त पडिक्कलला मिळाली मोठी जबाबदारी – विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्त पडिक्कलने केलेल्या अष्टपैलू आणि चमकदार कामगिरीची दखल घेत निवडकर्त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. मयंक अग्रवाल संघात खेळाडू म्हणून कायम असला, तरी नेतृत्वाची धुरा आता पडिक्कलच्या खांद्यावर असेल. २९ जानेवारीपासून मोहालीत पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी कर्नाटकने आपली कंबर कसली आहे. केएल राहुल आणि प्रसिध कृष्णाचे पुनरागमन – देवदत्त पडिक्कलची कर्णधारपदी वर्णी पुढील सामन्यासाठी कर्नाटक (Karnataka Ranji Squad) संघ अधिक भक्कम झाला आहे. केएल राहुलच्या पुनरागमनामुळे फलंदाजीची फळी मजबूत झाली आहे, तर दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा देखील संघात परतला आहे. मात्र, फिटनेसच्या कारणास्तव सर्वाधिक धावा करणारा करुण नायर या सामन्याला मुकणार आहे, तर अभिनव मनोहरला खराब फॉर्ममुळे डच्चू देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील कामगिरी – कर्नाटकचा संघ सध्या ‘ग्रुप बी’ मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यंत ६ पैकी ३ सामने जिंकले आहेत. करुन नायर (६१४ धावा) आणि रविचंद्रन स्मरण (५९५ धावा) संघासाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर गोलंदाजीबद्दल बोलायचे तर लेग स्पिनर श्रेयस गोपाल (३१ विकेट्स) याने सर्वात प्रभावी कामगिरी केली आहे. हेही वाचा – Shreyas Iyer Opportunity : टीम इंडियात मोठा फेरबदल! ‘या’ स्टार खेळाडूच्याऐवजी श्रेयस अय्यरची जागा फिक्स कर्नाटकचा रणजी संघ (पुढील सामन्यासाठी): देवदत्त पडिक्कल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, केव्ही अनीष, रविचंद्रन स्मरण, श्रेयस गोपाल, कृतिक कृष्णा, एम व्यंकटेश, विद्वत कवेरप्पा, प्रसिद्ध कृष्णा, मोहसीन खान, शिखर शेट्टी, केएल श्रीजित आणि ध्रुव प्रभाकर.