LSG vs RCB : जितेश शर्मा खरंच नॉट आऊट होता का? जाणून घ्या काय आहे नियम

LSG vs RCB Whats is Mankading rule : आयपीएल २०२५ च्या लीग सामन्यांमध्ये अंपायरांच्या काही निर्णयांमुळे बराच वाद झाला. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) यांच्यातील शेवटच्या लीग सामन्यात जितेश शर्मा याला थर्ड अंपायरने मांकडिंगच्या अपीलवर नॉट आउट दिले, जे नियमांनुसार आउट असायला हवे होते. याबाबत नियम काय आहे? जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
आरसीबीच्या डावात १७व्या षटकात लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी गोलंदाजी करत होता. त्याने जितेश शर्मा चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडून पुढे येत असल्याचे पाहिले आणि मांकडिंगद्वारे त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला. फील्ड अंपायर मायकेल गॉफ यांनी हा निर्णय थर्ड अंपायर उल्हास गांधी यांच्याकडे सोपवला. गांधी यांनी रिप्ले पाहून सांगितले की, राठीने आपली डिलीव्हरी स्ट्राइड पूर्ण केली आणि तो पॉपिंग क्रीजच्या पुढे गेला, त्यामुळे जितेशला नॉट आउट घोषित करण्यात आले. याचवेळी लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने अपील मागे घेतली.
Sequence of events ft #DigveshRathi!!
Today his fate made him a joker.😭😅#NoBall #Mankading #RCBvsLSG #RCBvLSG pic.twitter.com/lcRtWtEaDH— Ashish (@OfficialAsheesh) May 27, 2025
नियम काय सांगतात?
The #JiteshSharma run-out drama & #RishabhPant’s appeal withdrawal, what really happened? 🤔
Ex-umpire #AnilChaudhary breaks it all down for us. 👀#IPLPlayoffs begin 👉 Qualifier 1 | Thu, May 29 | 6 PM on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/ZgzL6eXaAN
— Star Sports (@StarSportsIndia) May 27, 2025
आयपीएल नियम ३८.३.१ आणि एमसीसी नियम ३८.३.१.१ नुसार, जर नॉन-स्ट्रायकर गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडत असेल, तर तो रन आउट होऊ शकतो. राठी याने गोलंदाजीचा हात पूर्ण फिरवला नव्हता, त्यामुळे जितेशला आउट द्यायला हवे होते. पॉपिंग क्रीजचा यात संबंध नव्हता. पंत याने अपील मागे घेतल्याने हा वाद फार वाढला नाही. माजी अंपायर अनिल चौधरी यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा – IPL 2025 Playoffs : चंदीगडच्या रणसंग्रामात कोण मारणार बाजी? जाणून घ्या चारही संघांचा प्लेऑफमधील रेकॉर्ड
सामन्याबद्दल बोलायचे तर,लखनौच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ऋषभ पंतच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला २२८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर जितेश शर्माच्या नाबाद ८३ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर १८.४ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह क्वालिफायर-१ साठी स्थान पक्के केले.





