Bhuvneshwar Kumar Record : भुवनेश्वर कुमारचा ऐतिहासिक पराक्रम! IPL इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच वेगवान गोलंदाज
Bhuvneshwar Kumar Record : भुवनेश्वर कुमारने क्रिकेटच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Bhuvneshwar Kumar 200 IPL Matches Record : आयपीएल २०२६ च्या हंगामातील ५० वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा सामना सुरू होताच आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने क्रिकेटच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
२०० सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज –
आयपीएलच्या इतिहासात २०० सामन्यांचा टप्पा गाठणारा भुवनेश्वर कुमार हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाजांसाठी फिटनेस टिकवून इतके सामने खेळणे हे एक मोठे आव्हान असते, जे ‘भुवी’ने लीलया पेलले आहे. या विशेष कामगिरीवर आनंद व्यक्त करताना भुवनेश्वर म्हणाला, “२०० सामने खेळणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे, ज्या संघाने गेल्या वर्षी ट्रॉफी जिंकली, त्याच संघाकडून खेळताना हा टप्पा गाठणे हे माझ्यासाठी अधिक खास आहे.”
दिग्गजांच्या पंगतीत स्थान –
𝙎𝙬𝙞𝙣𝙜𝙞𝙣𝙜 right into the 2️⃣0️⃣0️⃣ club! 🌪️
Bhuvneshwar Kumar becomes the first pacer to reach the milestone in #TATAIPL history 👏
Updates ▶️ https://t.co/W0eDq9aWb7#KhelBindaas | #LSGvRCB | @RCBTweets pic.twitter.com/5KxeTK4y7C
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026
आयपीएलमध्ये २०० हून अधिक सामने खेळणारा भुवनेश्वर हा आता केवळ १२ वा खेळाडू ठरला आहे. या यादीत एमएस धोनी २७८ सामन्यांसह अव्वल स्थानी आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली (प्रत्येकी २७७ सामने) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, २०० सामन्यांचा टप्पा गाठणारे सर्व १२ खेळाडू भारतीय आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये सुनील नरेन १९७ सामन्यांसह या विक्रमाच्या जवळ आहे.
| खेळाडू | एकूण सामने |
| एमएस धोनी | २७८ |
| रोहित शर्मा | २७७ |
| विराट कोहली | २७७ |
| रवींद्र जडेजा | २६४ |
| दिनेश कार्तिक | २५७ |
| भुवनेश्वर कुमार | २०० |
भुवनेश्वरची या हंगामातील कामगिरी –
भुवनेश्वर कुमारने केवळ सामनेच खेळले नाहीत, तर या हंगामात चेंडूनेही कमाल केली आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीतही कायम आहे. त्याच्या या अनुभवाचा आरसीबीला यंदाच्या हंगामात मोठा फायदा होत आहे.





