contract workers: कंत्राटी कामगारांना दहा हजारांचे बक्षीस!
contract workers:

स्थायी समितीची उपसूचनेद्वारे मान्यता; ११ कोटींचा खर्च अपेक्षित
contract workers: कंत्राटी कामगारांना बोनस देण्याचा प्रस्ताव गुरुवारी पुढे ढकलणाऱ्या स्थायी समितीने शुक्रवारी रात्री उशीरा कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर ११ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
पालिकेच्या दैनंदिन कामकाजात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कामगारांचेही महत्त्वाचे योगदान आहे. विविध विभागांमध्ये हे ११ हजार कामगार सेवा बजावतात. नियमित कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावासोबतच कंत्राटी कामगारांनाही आर्थिक लाभ मिळावा, अशी उपसूचना मांडण्यात आली.
त्यानुसार पात्र कंत्राटी कामगाराला बक्षीस देण्यास मान्यता दिली.पालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस किंवा बक्षीस देण्याचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कामगारांचाही बोनससाठी विचार व्हावा, अशी भूमिका यामागे असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाचा होता नकार ? contract workers:
गुरूवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव होता. मात्र, प्रशासनाने बोनस नियमात हे कर्मचारी येत नसल्याचे, तसेच त्यांची संख्याही माहित नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव पुढे ढकलला. शुक्रवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत पुन्हा यावर चर्चा झाली. कामगार संघटनांनीही पदाधिकाऱ्यांची भेट घेत ही मागणी लावून धरली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा प्रशासनाने कंत्राटी कामगारांची आकडेवारी जाहीर केल्यानंतर बक्षीस देण्यास मान्यता दिली.





