देशवासियांना दिलासा! करोनाबाधितांची संख्या ओसरतेय; दीड महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे मागील दोन-तीन महिन्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला होता. करोना रुग्णसंख्येचा रोज जागतिक विक्रम होताना जगाने पाहिले आहे. फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचे तांडवच बघायला मिळाले. दरम्यान, आता देशवासियांना थोडासा दिलासा मिळत असताना दिसत आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 65 हजार 553 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 76 हजार 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एका दिवसापूर्वी शुक्रवारी 173,790 तर गुरुवारी 186,364 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
India reports 1,65,553 new #COVID19 cases, 2,76,309 discharges & 3,460 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,78,94,800
Total discharges: 2,54,54,320
Death toll: 3,25,972
Active cases: 21,14,508Total vaccination: 21,20,66,614 pic.twitter.com/ARidVHcqv7
— ANI (@ANI) May 30, 2021
आज देशात सलग 17व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या दैंनदिन रुग्णांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 46 दिवसांमधील सर्वात कमी कोरोनाबाधितांची आज नोंद करण्यात आली आहे.
29 मे रोजी देशभरात 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच एका दिवसापूर्वी 30 लाख 35 हजार 749 लसीचे डोसे दिले होते. तसेच आतापर्यंत 34 कोटी 31 लाखांहून अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांहून अधिक आहे.
देशात करोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 8 टक्क्यांहून कमी झाली आहे. करोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण करोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.





