Bihar Election 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सध्याच्या ट्रेंड नुसार, एनडीएने आघाडी घेतली आहे. २४३ जागांचे सुरूवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप ८५ जागांवर आघाडीवर आहे, तर नितीश कुमार यांचा जेडीयू ७६ जांगावर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 61 जागांवर निवडणूक लढवली. त्यातील 4 जागांवरच पक्षाला आघाडी घेता आली आहे. काँग्रेसला ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने मागे टाकल्याचे समोर येत आहे. AIMIM या पक्षाने 5 जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये काँग्रेसचे 19 आमदार होते. काँग्रेस बिहारमध्ये सुद्धा रसातळाला गेल्याचे समोर येत आहे. सध्या कल ज्याप्रमाणे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आरजेडीसह महाआघाडी केली होती. आरजेडीला 150 जागा देण्यात आल्या होत्या. तर काँग्रेस 61 जागांवर लढत होती. AIMIM ची 5 जागांवर आघाडीवर सध्याच्या आकडेवारीनुसार, AIMIM बहादुरगंज, कोचाधामन, अमौर, बैसी आणि बलरामपूर या पाच जागांवर आघाडीवर आहे. या सर्व जागा किशनगंज, अररिया आणि जवळपासच्या जिल्ह्यांतील आहेत. येथे ओवेसी यांच्या पक्षाला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळताना दिसत आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येते एमआयएमला यश आल्याचा आरोप होत आहे. तर काँग्रेसपेक्षा बिहारमध्ये एमआयएम पक्ष वरचढ होताना दिसत आहे. Bihar Election 2025 | दरम्यान, राहुल गांधी यांनी बिहारच्या निवडणुकीत वोटचोरी आणि इतर मुद्यांवर जोरदार प्रचार केला. तेजस्वी यादव यांच्या सभांना पण मोठी गर्दी उसळली. पण त्याचे मतात परिवर्तन होत नसल्याचे दिसत आहे. Bihar Election 2025 | हेही वाचा: NDA च्या विक्रमी विजयाचा उत्सव ; पंतप्रधान सायंकाळी ६ वाजता भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार