Amit Deshmukh । माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे अनेक काँग्रेस नेते येत्या कळत भाजप पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
अशात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु होत्या. अमित देशमुख यांनी आता या चर्चांवर भाष्य केले आहे.
यावर आज अमित देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले,’वडील विलासराव देशमुख यांचं स्मरण केलं तर आपल्याला लक्षात येईल की निष्ठा काय असते. विलासराव देशमुख यांनी निष्ठेने समाजाचं काम करणं, राजकारण करणं, पक्षाचं काम केल. त्यांच्या राजकीय प्रवासादरम्यान असेही प्रसंग आले जेव्हा ज्यावेळी विलास राव देशमुख यांच्यावर कारवाई झाली. मात्र त्या काळातही विलासरावांनी पत्रकारांना सांगितलं की मला काँग्रेसमधून काढाल पण रक्तातली काँग्रेस कशी काढणार? विलासराव देशमुख यांचं हे वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीतही लक्षात घेण्यासारखं आहे. माझ्याबद्दलही लोकांनी अनेक चर्चा केल्या. पण मी लोकांना, माध्यमांना सांगितलं मी जिथे आहे तिथे ठीक आहे. असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा
महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे की,बबनराव घोलप?
Baramati Lok Sabha Candidate । सुप्रिया सुळे यांचे दादांना ओपन चॅलेंज, ‘तुम्ही म्हणतील ती जागा, वेळ अन् ठिकाण’