Congress Leader Dead : महाराष्ट्र हादरला..! मानाच्या ताटाच्या वादातून काँग्रेस नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ
Congress Leader Dead : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मानाच्या ताटाच्या वादातून काँग्रेस कार्यकर्ते यशवंत फके यांना मारहाण झाली होती

Congress Leader Dead : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मानाच्या ताटाच्या वादातून काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (Congress Leader Dead)
मृत्यू झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव यशवंत कृष्णा फके (वय ७३) असे आहे. ते कुणबी समाजाचे नेते तसेच काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी दुपारी ओझरवाडी येथील शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि फके यांना चौघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते आणि उपचारानंतर ते घरी विश्रांती घेत होते.
मात्र, शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (Congress Leader Dead)
फके यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक आणि ओझरवाडीतील नागरिकांनी कामथे रुग्णालयात गर्दी केली. सुरुवातीला नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर वातावरण शांत झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Congress Leader Dead)
यशवंत फके हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित होते. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे सक्रिय काम केले होते. त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे चिपळूण परिसरात शोककळा पसरली आहे. (Congress Leader Dead)
हेही वाचा




