NEET Paper Leak : “नीट पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसचे थेट संबंध समोर”; भाजप नेत्याचा आरोप
NEET Paper Leak: "संजय राऊत यांनी भाजपावर आरोप करण्यापूर्वी काँग्रेसला प्रश्न विचारावेत"

NEET Paper Leak : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटर (RCC) चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात CBI च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोटेगावकर यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने अत्यंत सुनियोजित पद्धतीने प्रश्नपत्रिका फोडण्याचे रॅकेट उभे केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी सीबीआयने काल लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केली. त्यानंतर दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी देखील सुनावली.
Govinda Event : गोविंदाच्या कार्यक्रमात गोंधळ! बाऊन्सर्स आणि पापाराझींमध्ये धक्काबुक्की
मात्र या पेपरफुटीच्या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसवर हल्ला करत मोठा दावा केला आहे. नवनाथ बन यांनी, “कुणी कुणाच्याही जवळचं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही.
काही ठिकाणी काँग्रेसचे पेपरफुटीशी थेट संबंध समोर येत आहेत. नीट पेपर लीक प्रकरणात दोषी कोणीही असो, त्याच्यावर CBI आणि केंद्र सरकारमार्फत कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. काँग्रेस आणि पेपरफुटीमधील संबंधांची चौकशी व्हावी,” अशी मागणीही बन यांनी केली.
मोटेगावकर अमित देशमुख यांचा माणूस? (NEET Paper Leak)
पुढे त्यांनी म्हंटले की, “मोटेगावकरांनी सार्वजनिक मंचावर स्वतःला अमित देशमुख यांचा माणूस असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय असलेला तोच व्यक्ती या प्रकरणातील सूत्रधार ठरत आहे. मग संजय राऊत अमित देशमुखांना, राहुल गांधी यांना प्रश्न का विचारत नाहीत?” असा सवाल नवनाथ बन यांनी केला आहे. संजय राऊत यांनी भाजपावर आरोप करण्यापूर्वी काँग्रेसला प्रश्न विचारावेत, असा सल्लाही बन यांनी दिला. NEET Paper Leak
संघटित टोळीचा सक्रिय सदस्य (NEET Paper Leak)
CBI ने न्यायालयात दावा केला की, मोटेगावकर हा प्रश्नपत्रिका फोडणे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य होता. RCC कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.
त्यांच्या मोबाईलमध्ये ३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेची कथित लीक झालेली प्रश्नपत्रिका आढळल्याचा दावाही तपास यंत्रणेने केला आहे. या सगळ्यात प्रश्नपत्रिका सर्वदूर पोहचविण्यासाठी महत्वाचे माध्यम टेलिग्राम असल्याचे तपासात पुढे आले आहे. NEET Paper Leak
हेही वाचा:






