Jacqueline Fernandez: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’मध्ये यंदा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत आहेत. हुमा कुरेशी, मौनी रॉय, डायना पेंटी यांच्यानंतर आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) हिनेही आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स फेस्टिव्हलमधील तिच्या नव्या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Jacqueline Fernandez) Jacqueline Fernandez जॅकलीनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील काही खास आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टायलिश पोझ देताना दिसत आहे. तिचा आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. (Jacqueline Fernandez) Jacqueline Fernandez या खास कार्यक्रमासाठी जॅकलीनने स्ट्रॅपलेस ब्लॅक मिनी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसत होती. साधा पण एलिगंट लूक ठेवत जॅकलीनने आपल्या फॅशन सेन्सची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली. तिच्या या लूकने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केले आहे. (Jacqueline Fernandez) Jacqueline Fernandez जॅकलीनने तिचा मेकअपही अतिशय सुंदर आणि क्लासी ठेवला होता. स्मोकी आय मेकअप आणि न्यूट्रल शेडची लिपस्टिक यामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत होता. तसेच तिने कोणतीही खास हेअरस्टाईल न करता केस मोकळे सोडले होते. त्यामुळे तिचा नैसर्गिक आणि आकर्षक लूक अधिक उठून दिसला. (Jacqueline Fernandez) Jacqueline Fernandez तिने या ड्रेससोबत डायमंड नेकलेस आणि मॅचिंग डायमंड ब्रेसलेट परिधान केले होते. या दागिन्यांमुळे तिच्या संपूर्ण लूकमध्ये आणखी ग्लॅमर वाढले. कानच्या रेड कार्पेटवर जॅकलीनचा हा स्टायलिश अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. Jacqueline Fernandez जॅकलीनच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. इतकेच नाही तर अभिनेत्री दिशा पाटनी, सोनम बाजवा आणि अनुष्का दांडेकर यांनीही तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. Jacqueline Fernandez यंदा ७९ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जॅकलीन एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडच्या शोमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिच्या उपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, जॅकलीनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या वर्षी ‘फतेह’ या चित्रपटात दिसली होती. नुकतीच ती ‘हाऊसफुल ५’मध्ये झळकली. तसेच लवकरच ती ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या चित्रपटात दिशा पाटनीचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.