मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तयारीत आता काँग्रेसने मोठे पाऊल टाकले आहे. पक्षाने आज पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ७० उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. त्यामध्ये, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम मतदारसंघातील वार्ड 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. ही यादी अधिकृतपणे काँग्रेसच्या ट्विटर (X) हँडलवरून जाहीर करण्यात आली आहे. पक्षाने म्हटले आहे की, “निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया!” काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी (VBA) सोबत आघाडी जाहीर केल्यानंतर लगेचच ही यादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती यांच्यातील लढत अधिक तीव्र होणार आहे.