Assam Election 2026 : काँग्रेसची ४२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; वाचा संपूर्ण यादी
Assam Election 2026 : आसाम निवडणुकीसाठी काँग्रेसने ४२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Assam Election 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काँग्रेसने मंगळवारी ४२ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीतील सर्वात चर्चेतील नाव म्हणजे लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई जे जोरहाट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
भाजप सरकारविरुद्ध थेट लढत
आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांचे सुपुत्र गौरव गोगोई सध्या जोरहाट लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून काँग्रेसने राज्यातील भाजप आणि मुख्यमंत्री हिम्मत शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध थेट आणि तगडे आव्हान उभे केले आहे.
गौरव गोगोई यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांना संभाव्य मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही पाहिले जात आहे.
तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांचा समतोल
पहिल्या यादीत काँग्रेसने ४२ जागांवर उमेदवार निश्चित करताना तरुण चेहरे आणि अनुभवी नेत्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष संघटनात्मक पातळीवरही मजबूत रणनीती आखत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, खासदार रकीबुल हसन हे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे काही मतदारसंघांत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. आसाममधील ही निवडणूक काँग्रेससाठी पुनरागमनाची संधी ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
The Central Election Committee of the @INCIndia has selected the following persons as Congress candidates for the forthcoming Assam Legislative Assembly elections.
Best wishes to everyone! #AssamWithCongress pic.twitter.com/XWO41vdSYn
— Assam Congress (@INCAssam) March 3, 2026





