BMC मध्ये भाजपचा वरचष्मा! स्वीकृत नगरसेवक पदासाठी ४ नावे; पाहा कोणाचे नशीब उघडले?
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.

Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची अंतिम यादी आली असून त्यांच्या नावाचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे देण्यात आला आहे.
भाजपकडून प्रतिक कर्पे, कमलाकर दळवी, नितेश राजहंस सिंह, प्रवीण छेडा यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळणार आहे. भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव भाजप गटनेत्यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे देण्यात आला.
भाजपला चार स्वीकृत नगरसेवकांचा कोटा, तर शिंदेसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकांचा कोटा आहे. तर संख्याबळाच्या तुलनेत ठाकरेसेनेकडे तीन स्वीकृत नगरसेवकपद असणार आहेत.
याआधी शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकांची यादी आयुक्तांना देण्यात आली आहे. शिंदेसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे.





