जयपूर – राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या समोरच भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष झाला आहे. राजस्थानमध्ये मुर्मू यांचा पक्षाच्या लोकप्रतिनिधींबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमाच्यावेळी हा प्रकार घडला. भाजपचे राज्यसभेतील खासदार किरोडी लाल मीना यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यावरून मीना यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर खडाजंगी झाली. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या समोरच हा शाब्दिक संघर्ष झाला.
खासदार मीना आणि राजस्थान विधानसभेतील भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांच्यात ही खडाजंगी झाली. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे. या दोघांमधील वाद वाढायला लागल्यावर शेखावत यांनी मध्यस्थी केली. मात्र नंतर दोन्ही नेत्यांनी हे भांडण मिटवल्याचे दर्शवले आणि एकमेकांना “भाऊ’ म्हणून संबोधले.
गावात बालविवाह झाल्यास सरपंचावर गुन्हा; महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या…
आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींकडून मुर्मू यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी मुर्मू यांचा भाजपच्या लोकप्रतिनिधींबरोबर एका हॉटेलमध्ये वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. डुंगरपूरवरून जयपूरला आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे आपण संतप्त झालो होतो. राठोड यांच्याशी आपले काहीही मतभेद नाहीत, असे स्पष्टिकरण मीना यांनी नंतर दिले.
बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री; एकनाथ शिंदेंनी केले शिवसेनाप्रमुखांचे स्मरण