पुणे | समलैंगिक असल्याचे लपवून विवाह केल्याप्रकरणी तक्रार
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती, सासू- सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणी वडगाव शेरी परिसरात वास्तव्याला आहे. जुलै २०२२ रोजी तरुणीचा एकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली असता, तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.
मोटार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणीही करण्यात आली. तरुणीला धमकाविण्यात आले. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.





