Pune : फुरसुंगीमध्ये कोकोपीट बनवणाऱ्या कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

लोणी काळभोर (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगीमध्ये असलेल्या कोकोपिट बनवणा-या कंपनीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील फुरसुंगी – पांडवदंड रस्त्यानजिक व फुरसुंगी – कदमवाकवस्तीच्या सीमारेषेवर कोकोपिट व इतर साहित्य तयार करण्याची कंपनी आहे. नारळाच्या शेंड्यावर या कंपनीत प्रक्रिया करून काथ्या, पायपुसणी, कोकोपिट, नारळ कीस आदी तयार केले जाते. आग मोठ्या प्रमाणावर असल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे दीड तासानंतर चार अग्निशामक बंबाच्या सहाय्याने तसेच कदमवाकवस्ती येथील स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणण्यात आली.
बुधवारी दिवसभर कंपनीत काम सुरु होते. कोकोपिट तयार करणारी मशीन सुरु राहिल्याने व वाढत्या उष्णतेने मशीनने पेट घेतला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे वाळलेल्या नारळांनी अचानक पेट घेतला. व मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/sanjay-raut-will-go-to-court-against-bjp-leader-kirit-somaiya-in-the-ins-vikrant-scam-case/
सदरची घटना समजताच वाघोली येथील पीएमआरडीए व कदमवाकवस्ती येथील हिंदुस्थान पेट्रोल टर्मिनल कंपनीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परिसरातील नागरिकांनी आग लागलेल्या कंपनीच्या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.





