Satara | आ. जयकुमार गोरे यांच्या पाठीशी माण-खटावची जनता ठामपणे उभी

वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी ) – माण तालुका पिंपरी गावामध्ये आमदार जयकुमार गोरे भाऊंनी विकास कामांची गंगा आणली आहे. माण खटावच्या जनतेच्या विकासासाठी भाऊ रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे माण-खटावची जनता आ. जयकुमार गोरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे प्रतिपादन सौ. सोनिया गोरे यांनी केले.
पिंपरी गावामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पक्का रस्त्याचे काम झाले आहे. आतापर्यंत पिंपरी गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. दहा लाखाचे सभामंडपाचे काम व गायकवाड वस्ती वरील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन सौ. सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्या बोलत होत्या
त्या म्हणाल्या, आ. जयकुमार गोरे यांनी केलेल्या विकास कामांवर माण खटावची जनता खुश आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाऊंच्या पाठीशी उभे राहावे व भाऊंना उच्चांकी मतांनी निवडून आणावे. माजी सरपंच चंद्रकांत शिलवंत यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच सौ. कोमल राजगे, सौ. ढवळे, नारायण राजगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. पार्वती गायकवाड, संजय गायकवाड, बबन गायकवाड, अंकुश गायकवाड, सुरेश राजगे, रामभाऊ राजगे, अजित खाडे, सदाशिव खाडे, तुळशीराम राजगे, निवास राजगे, आकाराम राजगे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.





