IND vs AUS 4th Test | बॉक्सिंग डे कसोटीतून ट्रॅव्हिस हेड आउट..? प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांनी दिली मोठी अपडेट….

IND vs AUS 4th Test | बॉर्डर-गावस्कर मालिकेत दमदार खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीने त्रस्त झाला असून तो बॉक्सिंग डे कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नुकतेच सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला संघातून वगळून त्याच्या जागी, सॅम कॉन्स्टन्सला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे हेडच्या अनुपस्थितीमध्ये तो ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
He is in!
Sam Konstas is set to make his Test debut on Boxing Day while a star batter remains an uncertainty #AUSvIND
MORE: https://t.co/ImefAIvmLd pic.twitter.com/olf48W6yYJ
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2024
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्रू मॅकडोनाल्ड यांनी हेडला अजूनही मांडीच्या स्नायूमध्ये ताण असल्याने समस्याच जाणवत आहेत, त्यामुळे कॉन्स्टास बॉक्सिंग-डे कसोटीत पदार्पण करणार आहे. आम्हाला विश्वास होता की हेड लढतीपूर्वी तंदुरुस्त होईल, मात्र अजूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ 19 वर्षांचा असणारा सॅम कॉन्स्टास ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू होणार आहे. पॅट कमिन्सने 18 व्या वर्षी 2011 मध्ये पदार्पण केले होते. बॉक्सिंग डे कसोटीत वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड जोश हेजलवूडची जागा घेणार असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. हेजलवूड दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर आहे.





