IND vs AUS 4th Test : आर. अश्विनच्या जागी अनकॅप्ड खेळाडूची संघात एंट्री, BCCIने केली घोषणा; लवकरच पोहोचणार मेलबर्नला…

IND vs AUS 4th Test : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघादरम्यानची ही कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. आता कसोटी मालिकेतील चौथा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवला जाणार आहे.
अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. गाबा येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने आपला निर्णय स्पष्ट केला. तो मालिका मध्येच सोडून भारतात परतला. त्यानंतर मुंबईच्या तनुश कोटियनची निवड भारतीय संघात करण्यात आली आहे. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी तो मेलबर्नला पोहोचेल.
🚨 NEWS 🚨
Border-Gavaskar Trophy: Tanush Kotian added to India’s Test squad. #TeamIndia | #AUSvIND
More Details 🔽
— BCCI (@BCCI) December 23, 2024
मुंबईत जन्मलेला कोटियन हा अनकॅप्ड खेळाडू आहे (ज्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही). तो ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. बीसीसीआयने सोमवारी कोटियनचा भारतीय संघात समावेश करण्यास मान्यता दिली. 26 वर्षीय तनुश सध्या अहमदाबादमध्ये मुंबईकडून विजय हजारे करंडक खेळत आहे. यापूर्वी तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा सदस्य होता.
कोटियनने मुंबईच्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्याने स्पर्धेत 41.83 च्या सरासरीने 502 धावा केल्या आणि 16.96 च्या सरासरीने 29 बळी घेतले होते.
IND vs AUS 4th Test | भारतीय गोलंदाजी पूर्णपणे बुमराहवर अवलंबून – चेतेश्वर पुजारा
त्याने 33 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 25.70 च्या सरासरीने 101 बळी घेतले आहेत. त्याने तीन वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याने फलंदाजीत 2 शतके व 13 अर्धशतकांसह 1525 धावा केल्या आहेत. याचबरोबरीने लिस्ट ए मध्ये देखील 20 सामन्यात 20 बळी व 90 धावा तर टी-20 मध्ये 6.39 च्या इकोनॉमीने 33 बळी टिपताना 87 धावा केल्या आहेत.





