CM Revanth Reddy: “नितीन कि कोण, मला तर नावही माहीत नाही,” ; रेवंत रेड्डी यांनी भाजप अध्यक्षांविषयी धक्कादायक विधान
CM Revanth Reddy: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यावर टीका केली आहे.

CM Revanth Reddy: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy ) यांनी तेलंगणाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यावर टीका केली आहे. रेड्डी यांनी यावेळी,”मला खरं तर त्यांचं नावसुद्धा माहीत नाही.” असे म्हटले.
२०२८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यावरही त्यांनी पलटवार केला. रेवंत रेड्डी यांनी, “पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला ‘चिरडून टाकेल’ असा दावा केला आहे. (CM Revanth Reddy)
तेलंगणाच्या तीन दिवसीय दौऱ्यावरून परतलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी म्हटले होते की, पुढील निवडणुकीनंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल. शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना, रेवंत रेड्डी यांनी नवीन यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, तेलंगणामध्ये भाजपला डोके वर काढू दिले जाणार नाही.
रेवंत रेड्डी काय म्हणाले? (CM Revanth Reddy)
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, “अलीकडेच, नवीन किंवा त्याचे जे काही नाव असेल, मला त्याचे नाव नक्की माहित नाही, पण तो इथे येऊन म्हणतो, ‘पुढचे सरकार माझेच असेल.’ तुम्ही पश्चिम बंगालबद्दलही हेच म्हणाला होतात. पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला १५ वर्षे लागली.” ममता बॅनर्जींमुळे तुमची ही युक्ती तिथे यशस्वी झाली असेल, पण इथे आमचे सर्व लोक तयार आहेत आणि ते तुम्हाला चिरडून टाकतील.
Peak arrogance on display …. Look at the choice of words . Perfect Congi . https://t.co/tcnRRjMPde
— B L Santhosh (@blsanthosh) June 30, 2026
बीएल संतोष यांचे प्रत्युत्तर (CM Revanth Reddy)
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “अहंकाराचा कळस दिसतोय. शब्दांची निवड बघा. खरा काँग्रेसमन.”
भाजप अध्यक्षांकडून काँग्रेस सरकारवर निशाणा (CM Revanth Reddy)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी तेलंगणातील काँग्रेस सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सत्ताधारी सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
तेलंगणा भाजपच्या कार्यकारिणी सभेला संबोधित करताना, नवीन यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना राज्य सरकारविरोधातील लढा तीव्र करण्याचे आणि लोकांचे प्रश्न तेलंगणातील प्रत्येक गाव आणि शहरात पोहोचवण्याचे आवाहन केले.





