मुंबई :– मुंबै बॅंकेतील कथित 123 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना क्लिनचीट मिळाली आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून मुंबै बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि इतर संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रवीण दरेकरांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट मिळाली असली तरीही न्यायालयाकडून त्यावर अद्यापही खुलासा झालेला नाही. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने 27 मार्च 2015 रोजी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. बॅंकेचे अध्यक्ष, संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पदांचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रे तयार केले. त्याआधारे 123 कोटींचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जानेवारी 2018 मध्ये सी समरी अहवाल दाखल करून प्रकरण बंद करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात दहा मजूर संस्थांना आरोपी घोषित केले आहे. Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…” परंतु, प्रवीण दरेकर आणि इतर संचालकांची नावे यात समाविष्ट नाही. हे आरोपपत्र पोलिसांनी सादर केले असले तरीही न्यायालयाकडून यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे प्रवीण दरेकरांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट मिळाली असली तरीही न्यायालयाकडून त्यावर अद्यापही खुलासा झालेला नाही.