Kunal Kamra : कुणाल कामराची विशेषाधिकार समितीसमोर पार पडली सुनावणी; टी शर्टची रंगली चर्चा, म्हणाला “एकनाथ शिंदेंवरील गाणे….”
Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'ठाणे की रिक्षा' गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात स्टॅण्डअप कॅामेडीयन कुणाला कामरा याची हक्कभंग समितीसमोर साक्ष नोंदवण्यात आली.

Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रिक्षा’ या गाण्यामुळे चर्चेत आलेल्या स्टॅण्ड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra ) याने विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर हजेरी लावून आपली बाजू मांडली. सुनावणीदरम्यान कामराने आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे सांगितले.
विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. या बैठकीत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कुणाल कामरा यांची साक्ष नोंदविण्यात आली. मराठीत विचारले जाणारे मुद्दे नीट समजावेत यासाठी कामराने सोबत भाषांतरकारही आणला होता. भाषांतरकाराकडून माहिती घेतल्यानंतरच तो प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होता. Kunal Kamra
प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कामराने हे गाणे आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असल्याचे सांगितले. यातून व्यंगात्मक अभिव्यक्ती मांडली असून कोणताही अपमान करण्याचा हेतू नसल्याचे त्याने स्पष्ट केले. कुणाल कामरा आपल्या दोन वकिलांसह या सुनावणीला हजर होता.

Kunal Kamra : कुणाल कामराची विशेषाधिकार समितीसमोर पार पडली सुनावणी; टी शर्टची रंगली चर्चा, म्हणाला “एकनाथ शिंदेंवरील गाणे….”
दरम्यान, समितीने कामराला बिनशर्त माफी मागण्यास सांगितले असता त्याने याबाबत उत्तर आपल्या वकिलामार्फत देणार असल्याचे सांगितले. पुढील निर्णय घेण्यापूर्वी काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची विनंती समितीकडून करण्यात आली असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
सुनावणीदरम्यान कामराचे वर्तन नम्र असल्याचे लाड यांनी नमूद केले. तसेच समितीसमोर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून कामराचे कृत्य विशेषाधिकार भंगात मोडते की व्यंगात्मक अभिव्यक्तीचा भाग आहे, यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टी शर्टची रंगली चर्चा Kunal Kamra
कुणाला कामरा प्रसिद्ध कॅामेडियन असून, त्याचे चाहत्यांची संख्या मोठी आहे. तो नेहमी त्याने परिधान केलेल्या टी शर्टमुळे चर्चेत असतो. सुनावणीवेळी त्याने परिधान केलेल्या टी शर्टची चर्चा रंगली. “I am not bad, you just don’t like me” असा मजकूर त्याने परिधान केलेल्या टी शर्टवर होता.
सुनावणीनंतर प्रसाद लाड काय म्हणाले? Kunal Kamra
विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुनावणीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. कुणाल कामरा यांची आज तिसरी की चौथी सुनावणी होती. त्यांचा जबाब आज रेकॉर्डवर घ्यायचा होता. आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या तक्रार प्रकरणी आज तक्रारदार प्रवीण दरेकर आणि कुणाल कामरा दोघांचे जबाब नोंदवण्यात आले, अशी माहिती लाड यांनी दिली.
दोघांना आज प्रश्न विचारण्यात आले. कुणाल कामरा यांना 24 प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, संविधानातून मिळालेल्या अधिकाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. हक्कभंग समितीच्या अधिकाराबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी सर्व प्रश्नांचं उत्तर दिली असल्याचे सांगितले.
सुषमा अंधारेंना समीतीकडून वेळ
दरम्यान, उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत. त्यामुळे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आठवडाभराने होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्टॅण्ड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक कविता सादर केली होती. त्याने सादर केलेल्या कवितेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसैनिकांनी थेट ज्या ठिकाणी कामराने कविता सादर केली होती. त्या स्टुडिओची तोडफोड केली होती.
हेही वाचा : Stock Market Today: शेअर बाजारात तेजी ! सेन्सेक्स ४२८ अंकांनी वधारला ; निफ्टीने २३,९१३ चा टप्पा ओलांडला





