अकरावीचा कट ऑफ उद्या जाहीर होणार
Updated On:

पुणे – अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी राज्यातील १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यींनी नोंदणी केली आहे. पहिल्या कॅप फेरीचे कनिष्ठ महाविद्यालयांचे कट ऑफ गुरुवारी (दि.२६) जाहीर होणार असून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय वाटपही जाहीर होईल.
अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ७२० असून त्यापैकी कॅप फेरी साठी प्रवेश क्षमता १६ लाख ६० हजार ८४ तसेच कोटा प्रवेश क्षमता ४ लाख ६३ हजार ६३६ इतकी आहे. ४ जुलैला रिक्त जागा जाहीर झाल्यावर तात्काळ दुसरी प्रवेश फेरीही सुरु होईल.
व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोटा प्रवेश फेरीसाठी २५ जून रोजी सायंकाळी ६ पर्यंत संधी आहे. कॅप फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी २६ जूनला जाहीर होईल.
टॅग्स:





