Pune : सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
Updated On:

पुणे: सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरू करण्यात आली असून, प्रवेश अर्ज ३० जून २०२५ पर्यंत स्वीकारण्यात येतील.
सर्व युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक, सैनिकांची अनाथ पाल्ये यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे यांनी केले आहे.





