Pune Crime News : पुण्यात दोन गटात हाणामारी; थेट कोयत्याने वार, काँग्रेस नेत्याविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यातील नारायण पेठेत दोन गटात बोर्ड लावण्यावरून हाणामारीची घटना घडली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायण पेठेत २ गटात रोड वर बोर्ड लावण्यावरून हाणामारी झाली होती. कोयत्याने वार करून एका गटातील दोन जण जखमी झाले होते. या प्रकरणी स्वप्नील रामचंद्र मोरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोपाळ तिवारी यांच्यासह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंद शिर्के (वय २७), हर्ष शिर्के (वय २९), निखिल जगताप (वय ३३) आणि अभिषेक थोरात (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, येथील मुरलीधर हॅाटेलजवळील रस्त्याच्या कडेला विनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते योगेश पेटकर मंडपवाले यांनी सूचना फलक लावला होता. मंगळवारी गोपाळ तिवारी व अन्य दोघे यांनी तो बोर्ड काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी बोर्ड काढू नका असे हर्षद शिर्के याला सांगितले. तो बेकायदेशाीर असल्यास मनपा काढून घेतील, यावरून ते कोण मला सांगणारा असे म्हणत त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर मोरे पोलिस चौकीत गेले. रात्री तीन तरुणांनी पुन्हा येऊन मोरे यांच्यावर वार केले. आपल्यावरील हल्ला गोपाळ तिवारी यांच्या सांगण्यावरून झाल्याचे फिर्यादींनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : भारतात आजपासून लागू होणार ट्रम्प टॅरिफ ; सध्या फक्त २५% च टॅरिफ लागू, ५०% कधी होणार ? जाणून घ्या




